शिवसेना आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा दणका धनुष्यबाण गोठवले-शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा बंदी
मुंबई/ शिवसेना आणि सेनेचे निवडणूक चिन्हं असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते .मात्र निवडणूक आयोगाने धनुष्य बाण हे चिन्ह गोठवून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाना मोठा धक्का दिला आहे तसेच शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा या दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे .
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि शिवसेना व बाळासाहेबांचे नाव वापरण्यास बंदी घातल्यानंतर शिवसेनेने मशाल,त्रिशूळ आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला दिला आहे तसेच तीन नावेही दिली आहेत यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे,शिवसेना प्रबोधन कार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे दिली आहेत . त्यावर आज दुपारी निर्णय होण्याची शक्यता आहे कारण निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नावे आज दुपारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत . आश्चर्याची गोष्ट यातील पहिल्या दोन नावांची म्हणजेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे ही नावे शिंदे गटांनी सुधा मागितली आहेत .त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .