[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

खबरदारीचा उपाय!भारताने 30 विमानतळ बंद केले – प्रवासी विमानांच्या अडून पाकचे भारतावर ड्रोन हल्ले

नवी दिल्ली/ ज्या देशात युद्ध सुरू होते त्या देशाची हवाई प्रवासी वाहतूक आणि विमानतळ बंद ठेवले जातात परंतु भारत-पाक युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानी हवाई वाहतूक सुरूच ठेवली असून प्रवासी विमानांच्या खालून भारतावर हल्ले करण्यासाठी ड्रोन पाठवले जात आहेत जेणेकरून भारताने ड्रॉ न वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर एखादे क्षेपणास्त्र प्रवासी विमानाला लागेल आणि मोठी जीवितहानी होईल परिणामी भारताला आंतरराष्ट्रीय जनसमुदायाला तोंड द्याव लागेल अशी आपली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या तणावातच एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील ३० विमानतळे येत्या १५ मेच्या सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी घोषणा केली होती की, देशातील ३० विमानतळ 10 मेपर्यंत बंद राहतील. परंतु, पाकिस्तानच्या हल्ल्यांत वाढ झाल्याने या निर्णयात बदल करण्यात आला. त्यामुळे आता नव्या आदेशानुसार विमानतळ १५ मेपर्यंत बंद राहणार आहेत.
केंद्र सरकारने ज्या 30 विमानतळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात चंडीगढ, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भूंटार, किशनगढ, पटियाला, शिमला, जैसलमेर, पठाणकोट, जम्मू, बिकानेर, लेह, पोरबंदरसह अन्य विमानतळांचा समावेश आहे. हे सर्व विमानतळ भारत पाकिस्तान सीमेजवळील शहरांत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या विमानतळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

error: Content is protected !!