[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ठाकरे -कोशारी यांच्यावर उच्च न्यायालय नाराज


मुूंबई-विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी याचिका भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.या याचिकेत वैधता दिसत नसल्याचे हायकोर्टाने सांगत ही याचिका फेटाळून लावली, मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही प्रमुख घटनात्मक पदं असून वैधानिक पदांवरील दोघांचा परस्परांवर विश्वास नाही,दोघांच्या वादातून सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहे. राज्यातील सध्याचे राजकीय चित्र दुर्दैवी असल्याचे कठोर निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सांगितले.
सुनावणीत आपली नाराजी व्यक्त करताना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले की, विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या निवडीवरुन हायकोर्टाने दिलेल्या मतांचा राज्यपालांनी मान राखायला हवा होता. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी एकत्र बसून आपल्यातील मतभेद, वाद मिटवायला हवे. कारण याचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत आहे. यामुळे राज्याचा कारभार सकारात्मकरित्या पुढे जाताना दिसत नसल्याचेे निरीक्षण दीपांकर दत्ता यांनी नोंदवले आहे. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षपद निवड याचिकेत वैधता दिसत नसल्याचे दत्तांनी सांगितले.

error: Content is protected !!