[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दिल्ली महापालिकेवर आपचा झेंडा- भाजपची 15 वर्षांची सत्ता गेली


दिल्ली/ ज्या दिल्ली महापालिकेवर गेली 15 वर्ष भाजपची सत्ता होती तिथे आता सत्तांतर झाले असून तिथे आम् आदमी पक्षाची सत्ता आली आहे. 4 डिसेंबर रोजी दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी निवडणूक झाली होती या निवडणुकीचा निकाल लागला आणि आम् आदमी पक्षाने सर्वाधिक 134 जागा जिंकून महापालिका काबीज केली तर भाजपला 104 जागा मिळाल्या काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले . मागील निवडणुकीत भाजपला 181 तर आम् आदमीला 48 आणि काँग्रेसला 27 जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीच्या प्रचारात भाजपने जबरदस्त ताकत लावली होती . पंतप्रधान मोदी पासून सर्व भाजप शाशित राज्याचे मुख्यमंत्री प्रचारत उतरले पण शेवटी भाजपचा पराभव झाला .

error: Content is protected !!