ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

बाप्पा निघाले- विसर्जनासाठी 18000 पोलिसांची सुरक्षा

मुंबई – आज अनंत चतुर्थी आहे . शहरातील छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे आज विसर्जन होणार आहे . मुंबईत विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणूक निघतात . या मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून मुंबईत प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या १८ तुकड्यांसह मुंबई पोलीस दलातील १८ हजार पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यांवर तसेच चौपाट्यांवर तैनात करण्यात आले आहेत . विसर्जनाच्या मिरवणुकांमुळे वाहतुकीच्या मार्गातही मोठे बदल करण्यात आले आहेत

9 सप्टेंबर रोजी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. तथापि, पोलिसांनी भाजीपाला, दूध, ब्रेड, बेकरी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर, पेट्रोल, डिझेल, रॉकेलचे टँकर, रुग्णवाहिका, सरकारी आणि निमशासकीय वाहने आणि स्कूल बसेसला यातून सूट देण्यात आली आहे.दहा दिवसांच्या गणेश चतुर्थी उत्सवाची समाप्ती अनंत चतुर्दशीच्या दिवशी होत आहे. मुंबईतील गणपती विसर्जनाच्या निमित्ताने नागरिकांना रहदारी निर्बंध आणि वाहतूक व्यवस्थापनविषयी मुंबई वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियावरून माहिती दिली तसेच नागरिकांना सहकार्याचे आव्हान केले.

74 रस्ते बंद 54 रस्त्यांवर एकेरी वाहतूक

मुंबई वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एकूण 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातील; 54 रस्त्यांवर वाहनांची वाहतूक फक्त एकेरी मार्गाने होईल, 57 रस्त्यांवर अवजड वाहनांना परवानगी देणार नाही; संपूर्ण शहरात 114 ठिकाणी पार्किंग निर्बंध लागू असतील.वाहतूक मर्यादा लागू करण्याबरोबरच, पोलिसांनी गणपती मंडळे आणि मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या भाविकांना खराब झालेल्या आणि असुरक्षित पुलांचा यादी वापर न करण्याचा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!