राणेंच्या पत्नी व मुला विरुद्ध लुक आऊट सर्क्युलर जारी
पुणे/ केंद्रीय लघु व सुष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे व पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध पुणे क्राईम ब्रांच ने लूक आऊट सर्कुलर जारी केले आहे .डी एच एल एफ या कंपनीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आर्ट लाईन प्रॉपर्टी या कंपनीकडून घेतलेल्या २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे . दरम्यान जर हे २५कोटींचे कर्ज फेडले तर ही कारवाई थांबू शकेल असे पुणे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले मात्र या कारवाईमुळे राणे कुटुंबीय अडचणीत आले आहे .