[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कमला मिलमधील बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर


मुंबई/ लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने आणि इथे झालेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या तक्रारी येऊ लागल्याने अखेर पालिकेने इथल्या बेकायदेशीर बांधकामावर तोडक कारवाई केली.
     कमला मिल कंपाऊंड मधील थोयोब्रोमा रेस्टॉरंट,मॅकडोनाल्ड, शिवसागर हॉटेल, नॅनो कॅफे,स्टारबक्स, बिरा टेंपरूस आणि फूड बाय देविका यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताश्विनी जोशी, डीएमसी प्रशांत सपकाळे आणि वार्ड अधिकारी स्वप्ना क्षीरसागर यांच्या आदेशाने जी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अगोदर पाहणी केली यात बीरा टेम्प्रुम आणि फूड बाय देविका यांनी परवान्यातील अटी शर्थींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले तसेचमोकळ्या जागेचा गैरवापर केल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. रेस्टॉरंट आणि फूड जॉईंट्सना खुल्या जागेत अन्न देण्याची परवानगी आहे. परंतु त्यासाठी काही अटी आहेत. त्यानुसार ती जागा उघडी असावी झाकलेली नसावी.परंतु या ठिकाणी कंपाऊंड वालंने त्या जागेला वेढलेले होते.आणि त्यावर ताडपत्रीही लावलेली होती.म्हणून तिथल्या टेबल खुर्च्या व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या तसेच बी के टी हाऊस कार्यालयासमोरील पार्किंग साठी बांधलेली बेकायदेशीर एम एस कंपाउंड वॉल ही पाडण्यात  आली
       मुंबई महापालिका जी दक्षिण इमारत कारखाने विभागाकडून कारवाई करण्यात आली या कारवाईत सहाय्यक अभियंता राजेश राठोड आणि संबंधित अभियंता आणि कर्मचारी सहभाग घेतला

error: Content is protected !!