मुंबईत ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालणाऱ्या अनेक बारवर पोलिसांचा छापा
मुंबई/ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालणाऱ्या मुंबईतील अंधेरी,घाटकोपर आणि ताडदेव भागातील नामांकित बारवर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात जवळपास २५ बारबाला ,बारचा स्टाफ आणि ग्राहकांना अटक करण्यात आली
अंधेरीच्या साची बार आणि रेस्टॉरंट मध्ये ऑर्केस्ट्राचां नावाखाली डान्स चालतो याची माहिती मिळताच युनिट 10 चां पोलिस पथकाने छापा टाकला यावेळी तिथे ७ बारबाला नृत्य करीत असल्याचे आढळले त्यामुळे या बारबाला ग्राहक आणि बारच्या करमचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.तसेच घाटकोपर मध्ये युनिट ७ चां पोलिस पथकाने कारवाई करून ४ बारबाला व काही ग्राहक तसेच हॉटेल व्यवस्थापकावर कारवाईवकरण्यात आली. ताडदेव येथे अशाच एका बारवर कारवाई करण्यात आली .गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारचा परवाना रद्द केल्यानंतर पोलिसांनी ऑर्केस्ट्रा चा नावाखाली डान्सबार चालवणाऱ्या विरुद्ध मोहीम हाती घेतली आहे.
