[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात ठाकरे सेनेला धक्का- माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंचा राजीनामा


नवी मुंबई/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील विशेषत: ठाणे, नवी मुंबईतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. विठ्ठल मोरे हे यांनी मात्र शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विठ्ठल मोरे हे नवी मुंबईत बेलापूर विधानसभेचे संपर्कप्रमुख, त्यानंतर जिल्हाप्रमुख देखील झाले. नुकतेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रतिष्ठेचे असलेले उपनेते पद देखील दिले होते. परंतु अचानक मोरे यांनी तडका-फडकी उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. राजीनामा पत्रात त्यांनी राजन विचारे यांच्यावर आरोप केले आहेत. राजन विचारे यांच्यावर आरोप करत राजीनामा पत्रात काय म्हटले?
विठ्ठल मोरे यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे, अतिशय जड अंत:करणाने पक्ष कठीण परिस्थितीत असताना मला माझ्या उपनेते पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे. ६ ऑगस्टला पक्षाचे मुखपत्र दै. सामना मधून जी शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली, त्या यादीबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती न देता ती यादी जाहीर झाली. मी गेल्या १० वर्षांपैकी पहिले तीन वर्ष बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होतो.आपण माझी उपनेतेपदी नियुक्ती करुन नवी मुंबई महापालिका क्षेत्राची जबाबदारी देऊन संघटनात्मक बांधणीसाठी मला प्रोत्साहित केले. या सर्व संघटनात्मक प्रवाहामध्ये ‘मातोश्री’चा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मला सदैव त्याचा अभिमान राहील. मात्र जे काम एकनाथ शिंदे यांनी माझ्या हाॅटेलवर छापा टाकून तसेच कोणतेही अनधिकृत बांधकाम नसताना मध्यरात्री ३.३० वाजता महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम येऊन हाॅटेलवर तोडक कारवाई केली. हा प्रकार तीन वेळा होऊनही पक्षाचा राजीनामा देण्याची मानसिकता माझ्यामध्ये कधी राहिली नाही. पण ते काम एकनाथ शिंदे यांच्यासाठी राजन विचारे यांनी सहज केले. त्यामुळे माझ्या मनामध्ये अतिशय खेद आहे. म्हणून वंदनीय शिवसेनाप्रमुखांची क्षमा मागून तसेच आपल्या माझ्यावरील विश्वासाबद्दल क्षमा मागून मी राजीनामा देत आहे.

error: Content is protected !!