ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेची समुद्रात लक्ष्मण रेषा

मुंबई/गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेक जण खोल समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न करतात. यामध्ये अपघाताचा धोका असतो, शिवाय नंतर मूर्ती पाण्यातून काढतानाही अडचणी येतात. यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने समुद्रातील ओहोटी रेषेजवळ मरिन नेव्हिगेशन बॉयज (दिशानिर्देशक) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुठपर्यंत विसर्जन करावे, हे चिन्हांकित करण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी खोलवर विसर्जन होऊ शकणार नाहीमुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई चौपाटी येते. या समुद्रात गणेशेमूर्तींचे तसेच देवींच्या मूर्तींचेही विसर्जन होते. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी अनेक जण समुद्रात खोलवर जातात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. शिवाय मूर्ती विसर्जन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्या बाहेर काढण्यासाठीही बरीच खटाटोप करावी लागते. बऱ्याच वेळा ओहोटीनंतर या मूर्ती चौपाट्यांवर इतस्तत: पसरलेल्या असतात, तर अनेक मूर्ती समुद्रातही खोलवर असतात. त्यामुळे ओहोटी रेषा व भरती रेषा या दरम्यान चिन्हांकित करून विसर्जनाचे क्षेत्र दर्शवणारे दिशानिर्देशक बसवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील पर्यावरण विभागाने दिली. यामुळे एका ठराविक अंतरापर्यंतच विसर्जन करता येणार आहे.

error: Content is protected !!