[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

इस्लामाबाद,कराची,लाहोर,रावळपिंडी शहरांवर तुफान हल्ले-भारत पाकिस्तान युद्ध सुरू

नवी दिल्ली/भारताने पाकिस्तानच्या नऊ लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या अत्याधुनिक एस ४०० एअर डिफेन्स सिस्टीमने पाकचा हा क्षेपणास्त्र हल्ला उधळून लावला. त्यानंतर भारताने लाहोर मधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त करून पाकिस्तानला अक्षरशा अपंग केले आहे. दरम्यान भारताने राजधानी इस्लामाबाद सह लाहोर,कराची,रावळपिंडी आदि पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर तुफान हल्ले केले तर पाकिस्तानकडून होणारे सर्व हल्ले परतवून लावीत पाकिस्तानची 3 विमाने पडली त्यामुळे युद्धाला सुरुवात झाली आहे.. दरम्यान भारताच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या प्रेतयात्रेत पाकिस्तानी लष्करी अधिकारी सहभागी झाले होते. ही बाब भारताने संयुक्त राष्ट्राच्या निदर्शनास आणून दिलेली आहे .त्यामुळे दहशतवाद्यांना आमचा पाठिंबा नाही हा पाकिस्तानचा दावा फोल् ठरला आहे .
पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी रात्री भारताच्या अवंतीपुरा, श्रीनगर, अनंतनाग ,पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंदर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड नाल,फलोदी ,उत्तरलाई आणि भुज अशा पंधरा शहरांवर ड्रॉन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय रडायंत्रणेने हा प्रयत्न निष्क्रीय ठरवला. दरम्यान पाकिस्तान कडून असा दावा करण्यात आला आहे की, भारताने आज आमच्या रावळपिंडी, कराची, लाहोर आणि गुजरनवाला या शहरांवर हल्ले केले. तर पाकिस्तान कडून खोटे दावे केले जात आहेत.पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतही खोटे बोलला .असे काल परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव दिनेश मिसरी आणि सैन्य दलाच्या प्रवक्त्या सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने कशाप्रकारे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, व भारताने त्याला कसा मुहतोड जवाब दिला याची माहिती सांगण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची एच क्यू ९ रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या १५ ठिकाणी भारतीय लष्कराचे तळ लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला. आम्ही हाणून पाडला. डेब्रिज गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तान कडून जोवर दहशतवादी हल्ले थांबणार नाही, तोवर ऑपरेशन सिंदूर थांबवले जाणार नाही अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. काल राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देताना, कशाप्रकारे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे हे सुद्धा सांगितले. तसेच भारताने केवळ दहशतवादी तळांवर हल्ले केले, भारताने पाकिस्तानाच्या लष्करी तळांवर किंवा सामान्य नागरिकांवर हल्ले केलेले नाहीत हे सुद्धा संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानी केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत १६ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५९ जण जखमी झाले आहेत असेही सांगितले. अशा स्थिती पाकिस्तानी आणखी हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तान वर निर्णायक प्रहार करण्यात येईल असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

error: Content is protected !!