[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

जो मनसेच्या नादाला लागला ,त्याची सत्ता गेली -राज ठाकरे


ठाणे – जो मनसेच्या नादाला लागला त्याची सत्ता गेली अशा शब्दात आज राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच महाराष्ट्रात मनसेची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला

ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल, संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी राज ठाकरेंचा इशारा
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ”त्यादिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं? कोणी केलं असेल. एक निश्चित सांगतो, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल. आमच्या मुलांचं रक्त असं वाया जाऊ देणार नाही. ते राज्यासाठी काम करायला आले आहेत.”
‘आपला एकच आमदार आहे, विधानभवन भरलं तर काय होईल’
एक ही है मगर काफी हैं, असा शोले चित्रपटातील संवाद बोलत राज ठाकरे म्हणाले, राजू पाटील हे पक्षाची बाजू विधानसभेत एकटेच मांडत आहेत. विधानसभा भरली तर काय होईल यांचं. ते म्हणाले, ”काही पक्षांना बांधलेले पत्रकार दुसऱ्या पक्षांबाबत गैरसमज पसरवतात. हे पत्रकार आम्हाला जे प्रश्न विचारतात ते इतर पक्षांना विचारणार नाहीत. ते लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात.”

दरम्यान, दादर येथील शिवतीर्थावर राज ठाकरे यांची 22 मार्च रोजी सभा आहे. या सभेत कोणाचे वाभाडे काढायचे, कोणावर काय बोलायचं हे, हे सगळं मी त्या सभेत बोलणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. या सभेत राज ठाकरे काय बोलतील आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

error: Content is protected !!