ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबईचा पाणीपुरवठा संकटात येत्या १० तारखेपासून टँकर सेवा बंद होणार


मुंबई/जलप्रधिकरणाबाबत केंद्राने नवे नियम लागू केल्यामुळे मुंबईतील टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर असोसिएशन येत्या दहा तारखेपासून टँकरने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईतील जनतेला आणि उन्हाळ्यात जल संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आल्याने अनेक विहीर आणि बोअरवेल मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याचे आढळून आल्याने पाणीपुरवठा कसा करायचा? या चिंतेमुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने या निर्णयाविरोधात वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील विविध भागात आधीच पाणी पुरवठा सुरळीत नसताना वॉटर टँकर बंद झाल्या
याबाबत मुंबई टँकर असोसिएशनचे अंकूर वर्मा म्हणाले, “मुंबई वॉटर टँकर असोसिएशन १० एप्रिलपासून व्यवसाय बंद करणार आहे. कारण आम्हाला सेंट्रल लॉन वॉटर अथॉरिटीबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस आली आहे. ३८१ ए ची नोटीस आली आहे. तुम्ही तुमची बोअरवेल काढून पाईप डिसमेंट करावी, अशी ही नोटीस आहे. ७० ते ८० वर्षांपूर्वीचा हा व्यवसाय आहे. जर टँकरच नसतील पाण्याची वाहतूक कशी होणार?” असा सवाल त्यांनी केला

error: Content is protected !!