[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचा महाडच्या पुरग्रस्ताना मदतीचा हात .

उल्हासनगर / प्रतिनिधी : गेल्या दीड हप्त्या पुर्वी महाड येथे कोसळलेल्या धुव्वाधार पावसाने महाड च्या सावित्री नदीला आलेल्या पुरा मुळे महाड शहरातील नागरिक व व्यापारी पुर्णता उध्वस्त झाला असुन या पुरग्रस्तांचे सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे . तेव्हा या पुरग्रस्त नागरिकाना एक हात मदतीचा म्हणुन उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते ॲड अनिल बागुल व त्यांच्या सहकाऱ्याने महाड येथे जावुन त्याना राशन सह जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले आहे .

उल्हासनगर येथिल वंचित च्या नेत्या सह युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शना खाली महाड येथे जावुन पुर स्थिती चा आढावा घेवुन मग तेथिल गरजु पुरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करुन एक मदतीचा हात दिला आहे . या वेळी त्यांच्या सोबत वंचित बहूजन आघाडीचे उपाध्यक्ष .अनिल जाधव . ॲड अनिल बागुल हे उपस्थित होते. तर उल्हासनगर येथुन मदत कार्य करण्यासाठी बागुल सोबत दिलीप बोराडे . योगेश लांडगे व पालसर हे उपस्थित राहुन पुरग्रस्त नागरिकाना जीवनावश्यक वस्तु देण्यात आल्या .

error: Content is protected !!