[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पालिकेच्या मार्केट बाहेरील अनधिकृत गाळ्यावर कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक – ८१ मध्ये पालिकेने बांधलेल्या भाजीपाला मंडई अधिकृत इमारतीच्या बाहेर असलेल्या अनधिकृत गाळ्यामुळे, पालिकेच्या मार्केट इमारतीतील गाळे गाळेधारकांविना गेली ७ वर्षापासून पडुन आहेत. मार्केट बाहेर असलेल्या अनधिकृत गाळ्यावर कारवाई करून, स्थानिक नागरिकांसाठी मार्केट सुरू करण्याची मागणी कांग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल यांनी केली आहे.
शिरवणे गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक रस्त्यांवर फेरीने व्यवसाय करत असल्याने रहदारी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पालिकेने सुसज्ज मार्केट तयार करावे अशी मागणी सन-२००३ मध्ये आपण पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने प्रभाग क्रमांक-८१ येथे सुसज्ज इमारत बांधून सन -२०१० तयार केली. या मार्केट मधील पन्नास टक्के गाळे हे स्थानिक भाजी विक्री करणाऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी देखिल करण्यात आली होती. सन -२०१८ मध्ये मार्केटचे उद्घाटन देखिल करण्यात आले. मार्केट इमारती बाहेर अनधिकृत बांधकाम केलेले गाळे ३ते ४हजार रुपये भाडयाने मिळत असल्याने, पालिकेने बांधलेल्या अधिकृत मार्केट इमारतीतील गाळे गाळेधारक विना पडुन आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे सुसज्ज मार्केटचे स्वप्न कधी पूर्ण होणार पालिकेने मार्केट इमारती बाहेर असलेली अनधिकृत गाळ्यावर कारवाई करून, पालिकेचे मार्केट सुरू करावे अशी मागणी संतोष सुतार यांनी पालिक आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या कडे केली आहे.

error: Content is protected !!