[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

आघाडीतल्या नाराजांवर भाजपचे जाळे


मुंबई/ एरव्ही मुस्लिम सपा आणि एम आय एम सारख्या पक्षापासून दूर राहणाऱ्या भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मदत मिळावी म्हणून चक्क या दोन पक्षांच्या चार मुस्लिम आमदारांवर जाळे टाकायला सुरुवात केली आहे .दरम्यान काल उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्राय ट्रेण्ड मध्ये एक बैठक झाली
भाजपचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारांमध्ये जबरदस्त टक्कर आहे .महाविकास आघाडीकडे संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे पण भाजप कडे मात्र कमी मते असल्याने भाजप कडून एम आय एम आणि सपा वर जाळे टाकले जात आहे . समाजवादी पक्ष महाविकास आघाडीवर नाराज असल्याने काल भाजप कडून आबु आझमी यांना अनेक वेळा फोन करण्यात आला पण या बाबतचा निर्णय आमचे नेते अखिलेश यादव घेतील असे आझमी यांनी सांगितले तर एम आय एम पक्षालाही भाजप कडून संपर्क साधण्यात आला असल्याचे समजते मात्र या दोन्ही पक्षाचे 4 आमदार भाजप सोबत कदापि जाणार नाहीत असे सांगितले जात आहेत .

error: Content is protected !!