ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

युद्ध काळातील नागरी सुरक्षेची रंगीत तालीमआज संपूर्ण देशात मोक ड्रिल


नवी दिल्ली/ भारत पाकिस्तान मधील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवणारे मॉक ड्रिल बुधवारी देशभरातील २४० शहरांमध्ये केले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई ठाण्यासह १६ शहरांचा समावेश आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी चार वाजता, सायरन वाजल्यावर मॉक ड्रिल ची ही प्रात्यक्षिके सुरू होतील. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना तसे आदेश दिलेले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निर्णायक कारवाई करण्याचे भारताने ठरवले आहे.त्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून तयारी सुरू आहे.पंतप्रधान ,संरक्षण मंत्री, लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख यांच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे युद्ध अटळ आहे .मात्र युद्ध झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी याचे प्रात्यक्षिक बुधवारी ७ में रोजी दाखवले जाणार आहे.भारतातील लखनौ, जौनपुर आदी शहरांमध्ये मंगळवारी मॉक ड्रिल झाले. त्यानंतर बुधवारी मुंबई सह देशातील २४० शहरांमध्ये मॉक ड्रिल केले जाणार आहे. दुपारी चार वाजता सायरन वाजेल वाजताच युद्धासारखी कृत्रिम परिस्थिती तयार केली जाईल. आणि त्या परिस्थितीवर नागरिकांनी कशी मात करायची, याचे प्रत्यक्ष दाखवले जाणार आहे. खास करून शालेय विद्यार्थ्यांना ही प्रात्यक्षिके दाखवून हल्ल्याच्या वेळी कशाप्रकारे आपली सुरक्षा करायला हे दाखवले जाणार आहे. त्यामुळे बुधवारी चार वाजता सायरन वाचताच कुणीही घाबरू नये. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. त्याचबरोबर टीव्हीवर जी प्रात्यक्षिकेत दाखवली जातील, ती व्यवस्थित आत्मसात करून, प्रत्यक्ष युद्ध झाल्यास तशाच प्रकारे स्वतःचा जीव वाचवावा. असे सरकारकडून आवाहन करण्यात आलेले आहे
मॉक ड्रिल कशा स्वरूपाचे असेल याचे काही पॉईंट्स जारी करण्यात आले आहेत त्यानुसार
हवाई हल्ल्याच्या वेळी इशारा प्रणालीची सतर्कता तपासणे,
भारतीय हवाई दलाशी हॉटलाइन आणि रेडिओ संपर्क स्थापित करणे,मुख्य आणि सहाय्यक नियंत्रण कक्षांचे योग्य कार्य सुनिश्चित करणे,
. सामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना हल्ल्याच्या बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यास शिकवणे,. हल्ला झाल्यास निर्वासन योजना आणि त्याची अंमलबजावणी तपासणे,
ब्लॅकआउट दरम्यान घ्यायच्या सर्व खबरदारीचा आढावा घेणे, वीज बंद पडल्यास काय करावे हे सांगणे., महत्त्वाच्या संस्था आणि मोठे कारखाने कसे लपवायचे ते सांगणे, नागरी संरक्षण प्रणाली सक्रिय करणे, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणारी पथके, अग्निशामक, बचाव कार्यांचे व्यवस्थापन.आदी सर्व प्रकारची माहिती या मोबाईल मध्ये दिली जाणार आहे .
बॉक्स
महाराष्ट्रातील १६ शहरे
बुधवारच्या महाराष्ट्रातील 16 शहरांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये राजधानी मुंबई ,पुणे, नाशिक ,सिन्नर,संभाजी नगर ,भुसावळ, मनमाड, उरण, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी तारापूर, रोहा, पिंपरी चिंचवड,रायगड, थळ वायशेत ( अलिबाग)आदी १६ शहरांचा समावेश आहे.

error: Content is protected !!