बंगाल, बिहार, यूपीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रा नंतर समाजकंटकाकडून दंगल घडवण्याचे प्रयत्न
कोलकाता/राम नवमीच्या शोभायात्रेत भाग घेऊन परतणाऱ्या रामभक्तांवर पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आल्यामुळे रामनवमी उत्साहाला गालबोट लागले तसेच बिहारच्या अनेक भागांमध्ये शोभायात्रांचे रोड बदलण्यात आल्यामुळे राम भक्तांमध्ये संतापाची लाट होती तर कानपूर मध्ये शोभायात्रेत पोलीस व राम भक्तांमध्ये हाणामारी झाली त्या सर्व घटना पाहता रामनवमीच्या निमित्ताने काही समाजकंटकांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता परंतु तो यशस्वी झाला नाही.
कानपूरच्या रावतपुर मध्ये रामनवमीच्या दिवशी नऊ वेगवेगळ्या समित्यांकडून दरवर्षी शोभायात्रा काढली जाते. मात्र यावर्षी शोभायात्रेत लाऊड स्पीकर आणि डीजे लावण्यावरून पोलीस व राम भक्त कार्यकर्ते यांच्यात तीव्र मतभेद होते. पोलिसांनी डीजेला परवानगी नाकारल्यामुळे नऊ पैकी सात समित्याने शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही रामनवमीच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत लाऊड स्पीकर आणि डीजेही वाजवण्यात येत होता. त्याला पोलिसांनी हरकत घेतली आणि लाऊड स्पीकर व डीजे जप्त करून दोन तरुणांना ताब्यात घेतले .त्यामुळे शोभायात्रेत सामील झालेले राम भक्त चिडले आणि त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली तसेच पोलिसांवर चपला फेकायला सुरुवात केली .इतकेच नव्हे तर पोलिसा बरोबर झटापट करून पकडलेल्या दोन तरुणान पोलिसांच्या ताब्यातून सोडवले.त्यामुळे पोलिसांनीही शोभायात्रेतील लोकांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार केला .त्यामुळे शोभायात्रेत सामील रामभक्त आणखीनच बिथरले. आणि त्यानंतर पोलिस व रामभक्तांमध्ये हाणामारी सुरू झाली. या घटनेचे पडसाद अन्य भागात उमटू नयेत म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी रामनवमी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा सुरू केली. मात्र या घटनेला जबाबदार असलेले पोलीस जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शोभायात्रा पुढे जाणार नाही असा पवित्रा राम भक्तांनी घेतला. आणि संपूर्ण रस्ता जाम करून टाकला .बराच वेळ ही धमासान सुरू होती. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शोभायात्रेतील राम भक्तांची समजूत काढली .तेव्हा कुठे हे प्रकरण शांत झाले. मात्र या घटनेमुळे कानपूर मधील राम नवमीला गालबोट लागले. दरम्यान बिहारच्या अनेक भागात शोभायात्रांचे रूट बदलल्यामुळे रामभक्त संतप्त झाले होते. तिथेही पोलीस आणि राम भक्तांमध्ये राडेबाजी झाली. देशाच्या इतर भागातही काही ठिकाणी चुटपुट घटना घडल्याचे समजते.मात्र कानपूर मधील घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. आता या घटनेची राज्य सरकार चौकशी करणार असल्याचे समजते. दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये शोभायात्रेत भाग घेऊन परतणाऱ्या रामभक्तांवर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली त्यामुळे राम भक्तांमध्ये संतापाचे वातावरण होते हे सर्व पाहता रामनवमीच्या निमित्ताने समाजकंटकांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता परंतु पोलिसांमुळे तू यशस्वी झाला नाही.
