[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबई महानगरपालिका शूटिंगबॉल संघाने पटकावले अंतिम विजेते पद


ए वन संघ माणकुले ता. अलिबाग जि. रायगड आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा दि. ५ मार्च २०२३ रोजी दिवस/रात्र विद्युत झोतात कै. विश्वास शंकर पाटील क्रीडानगरी माणकुले येथे पार पडल्या. सदर स्पर्धेत राज्यातील बलाढय अशा २० संघांना निमंत्रित करण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिका शूटिंगबॉल संघाने साखळी सामान्य मध्ये विजयी घोडदौड करत उपांत्य फेरीत मजल मारली व उपांत्य फेरीत विद्युत मांडवखर संघाचा २१ विरुध्द १६ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला व अंतिम फेरीत ए वन माणकुले संघाचाही २१ विरुद्ध १६ गुणांनी पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
मुंबई महानगरपालिका संघाने कर्णधार सुमित पाटील, नयन पाटील, महेश कदम, हेमंत कांबळे, तुषार म्हात्रे, साईश मिरकर व राजू काळे यांच्या चतुरस्र खेळाने विजय मिळवला. अष्टपैलू शूटिंग करणारे सायन रुग्णालयाचे नयन पाटील यांना उत्कृष्ट शूटर चषकाने गौरविण्यात आले. संघाचे संघ व्यस्थापक जालंदर चकोर व संघ प्रशिक्षक विद्याधर जामसंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिका संघाने अजिंक्यपद पटकावले.

या स्पर्धेचे नियंत्रक निलेश ठाकूर व अनिकेत पाटील हे होते. तसेच राष्ट्रीय पंच सुनिल गायकवाड व विजय गोंधळे यांनी या स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले.

error: Content is protected !!