[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.संतोष रेवणकर सेवानिवृत्त


मुंबई/ मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात  तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे आणि जनतेचे डॉक्टर अशी ओळख निर्माण करणारे उप कार्यकारी आरोग्य अधिकारी  डॉ संतोष रेवणकर हे सेवानिवृत्त नुकतेच झाले असून पालिकेचा आरोग्य विभाग आणि ज्या मुंबईकरांवर त्यांनी यशस्वी उपचार केले ते  सर्वजण डॉ रेवणकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. त्यांनी आपल्या सेवा काळात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी,उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (कुटुंब कल्याण आणि माता बाल संगोपन) म्हणून पदाचा धडाडीने कारभार सांभाळला. त्यांच्या निवृत्ती नंतरच्या आरोग्यदायी जीवन प्रवासासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!