[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वेळी तोडफोड

सोलापूर/शनिवारी सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या वेळी काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली यात एक किसान किरकोळ जखमी झाला तर याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर त्या मोर्चात स्फोटक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याचे समजते
सध्या देशभर आणि खास करून महाराष्ट्रात हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार विधाने केली जात आहेत काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता असे वादग्रस्त विधान केले होते त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून आज सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा तर्फे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या सभेत ती राजा सिंग आणि हितेश राणे या भाजपा आमदारांनी भाषणे केली त्यामुळे येथे वातावरण तणावपूर्ण बनले होते तसेच या मोर्चादरम्यान काही दुकानांवर दगडही करण्यात आली होती या दगडफेकी सात ते आठ दुकानांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी अज्ञात आणि विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे

error: Content is protected !!