[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा कोणताही परिणाम नाहीआज विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज!


मुंबई/ आज अनंत चतुर्थी! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तसेच काही घरगुती बाप्पांचे आज वाजत गाजत विसर्जन होणार आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबईत घातपात घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे आजच्या गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आहेत.३६ हजाराहून अधिक पोलिस मुंबईच्या वेगवेगळ्या भागात आणि खास करून चौपाट्या तसेच विसर्जन मार्गावर तैनात आहेत.संपूर्ण विसर्जन सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे.त्यामुळे मुंबईकर जनतेने अजिबात घाबरू नये.अफवांवर विश्वास ठेवू नये.भक्तिभावाने तसेच निर्भयपणे बाप्पांना निरोप द्यावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी मुंबई पोलिसांना एक धमकीचा वॉटसअप मेसेज आला होता त्यात अनंत चतुर्थीला मुंबईत बॉम्बस्फोट घडवले जातील त्यासाठी ४०० किलो आरडीएक्स मुंबईत आणण्यात आले असून १४ पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसले आहेत असे मेसेज मध्ये नमूद करण्यात आले होते.याबाबत बोलताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या zव्हॉट्सअॅप नंबरवरून हा मेसेज पाठवण्यात आला होता, तो नंबर शोधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. “मुंबई पोलिस नेहमीच सतर्क आहेत आणि आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. जनतेने धाबरू नये, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि सर्व काही शांत आहे. अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. शहरात सर्वत्र नाकेबंदी, संशयित वाहनांची तपासणी आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविक मुंबईत दाखल होत असल्याने, पोलिसांनी मंडप परिसर, रेल्वे स्थानके, विमानतळ, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये गस्त वाढवली आहे.
दरम्यान, सायबर सेल आणि दहशतवादविरोधी पथकाने मिळालेल्या संदेशाचा सखोल तपास सुरू केला आहे. हा संदेश खरा आहे की खोटा, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक मदतीचा वापर करत आहेत. अशा प्रकारे मिळणाऱ्या धमक्या अनेकदा खोट्या निघाल्या असल्या तरी, पोलिस अलर्ट मोडवर आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळल्यास लगेच पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.गणेश विसर्जानासाठी १२ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० डीसीपी आणि ६१ एसीपी सोबतच 3 हजार अधिकारी आणि १८ हजार कर्मचारी, १४ एसआरपीएफ आणि क्यूआरटी पथके तैणात आहेत. १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार आहे. बिट मार्शल, निर्भया पथक आणि साध्या वेधातले पोलिसही तैनात असणार आहेत. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात लोकांनी साजरा करावा, मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सत्यनारायण चौधरी यांनी केलं आहे.मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबाबत मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी म्हटले की, उद्या अनंत चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तयारी केलेली आाहे. हा उत्सव राज्योत्सव म्हणून सरकारने घोषित केलेला आहे. उद्या ६ हजार ५०० सार्वजनिक गणेश मूर्तीचं आणि जवळपास एक ते दीड लाख घरगुती मूर्तीचे विसर्जन आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक मूर्तीच्या विसर्जनासाठी चौपाट्या तयार आहेत. चौपाट्यांवर लाइफ गार्ड, मुंबई पोलीसंचा बंदोबस्त आहे. मुंबईच्या सर्व चौपाट्यांवर पालिकेने विसर्जनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत
दक्षिण विभागातील ३९ मार्ग बंद
मुख्य मध्य विभागातील १९ मार्ग बंद
पूर्व उपनगरे विभागातील ७ मार्ग बंद
पश्चिम उपनगरातील १९ मार्ग बंद

error: Content is protected !!