ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दिवाळी नंतर पालिका निवडणूक होणार


मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होणार अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.दरम्यान या निवडणुकीत व्हि व्हि पॅटचां वापर होणार नसल्याने मतदान यंत्रात घोटाळे होण्याची शक्यता आहे.दरम्यान व्हि व्हि पॅटचा वापर न करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णया विरुद्ध शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते.
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मनपा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे. नाशिक विभागात एकूण ५० लाख ४५ हजार मतदार असून ४९८२ मतदान केंद्रे आहेत. यासाठी ८७०५ कंट्रोल युनिट्स लागणार असून १७००० पेक्षा अधिक मतदान यंत्रांची आवश्यकता आहे. सर्व निवडणुका एकत्र घेतल्यास मनुष्यबळाची मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रथम कोणत्या संस्थेची निवडणूक होणार, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही, असे दिनेश वाघमारे यांनी म्हटले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना वाघमारे म्हणाले की, एससी एसटी आरक्षण निश्चित असते, परंतु ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “मागील निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण होते आणि यावेळीही तेच तत्त्व पाळले जाणार आहे.”
१जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाईल. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक यंत्रणा यांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक टप्या टप्प्याने होणार आहे त्यामुळे सुरुवातीला जिल्हा परिषदा,पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार की पालिका ,महापालिका यांच्या निवडणुका होणार याबाबत उत्सुकता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असेल कारण सत्ताधारी भाजपालकोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची आहे.यासाठीच ही निवडणूक स्वतंत्र न लढता महायुतीमधील सर्व पक्षांनी एकत्रितपणे लढवावी यासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे .तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती करून ही निवडणूक लढवणार का याकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.ठाकरे बंधूंनी एकत्रित निवडणूक लढवण्यास मराठी मतदारांची एकगठा मते या ठाकरे बंधूंच्या युतीला मिळतील .पण तसे झाले नाही तर महायुतीला संधी आहे.असे बोलले जाते
इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीत अत्यंत महत्वाचा समजल्या जाणाऱ्या व्हि व्हि पॅटचा वापर केला जाणार नाही असे राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे.तसे असेल तर निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोटाळे होण्याची शक्यता आहे.त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट न्यायालयात जाणार आहे.

error: Content is protected !!