[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओला कार चालकाच्या हत्येच्या गुन्ह्यात फिर्यादी पत्नीच निघाली मुख्य आरोपी ,घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या

 भिवंडी :(आकाश गायकवाड ) मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून कार चालकाची हत्या केल्याची घटना 1 ऑगष्ट रोजी उघडकीस आल्या नंतर पत्नी च्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे .पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरा सोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नसल्याने त्या रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून दोघा जणांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी फिर्यादी 32 रा. कणेरी, प्रियकर नितेश गोवर्धन वाला 28 रा.भादवड,मैत्रीण प्रिया सुहास निकम 32 रा.वेताळपाडा असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे जण फरार असून त्यांचा तपास नारपोली पोलीस करीत आहेत .

मयत प्रभाकर व पत्नी श्रुती या दोघांचेही अनैतिक वैवाहिक संबंध असून त्यातून पत्नी श्रुती हिने प्रियकर नितेश वाला या सोबत विवाह करण्यासाठी आपल्या पती कडे घटस्फोटा साठी तगादा लावला होता पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकम हिला दिली असता तिने ही आपल्या पतीला सोडून वेगळी राहत  असल्याने तिने पतीची हत्या कातून काटा काढण्याचा सल्ला दिला असता त्यासाठी आपल्या ओळखीचे दोन युवक असल्याचे सांगितले असता पत्नी श्रुती हिने स्वतः कडील दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणाऱ्या दोघा जणांना दिली व त्यानंतर पत्नी श्रुती प्रियकर नितेश मैत्रीण प्रिया यांनी  कट रचून हत्या करणाऱ्यांनी 31 ऑगष्ट च्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाईल करून रात्री दहा वाजता कार बुक केली , व त्यानंतर प्रवासात मानकोली येथे त्या दोघा मारेकऱ्यांनी गळा आवळून हत्या करून शव कार मध्येच ठेवून पसार झाले होते .

या गुन्ह्याचा नारपोली पोलिसां सह  गुन्हे शाखा ठाणे हे एकत्रित करीत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात फिर्याद देणारी पत्नी श्रुती हीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे ठाणे मुख्य गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे .या गुन्ह्यात  पत्नी श्रुती ,प्रियकर नितेश व मैत्रीण यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 13 ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून हत्या करणारे दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे हे करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे

error: Content is protected !!