ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ मुंबईत दीडशे जागा लढवणार


मुंबई/ आगामी महापालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे त्यासाठी भाजपाने मुंबईतील २२७ पैकी १५० जागांवर दावा केलेला असून महायुतीत आपणच मोठा भाऊ असून शिंदे आणि अजितदादा हे छोटे भाऊ असल्याचे म्हटले आहे.मात्र शिंदे गटाच्या नेत्यांना हे मान्य नसल्याने निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. बीएमसीमध्ये भाजप मोठा भाऊ असेल तर ठाण्यात शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ ठरणार असल्याचे समजतेय. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर चर्चा सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुरू केली आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यात याबाबत चर्चा झाल्याचे समजतेय. अमित शहा यांनी महाराष्ट्र भाजपला ज्या ठिकाणी आपली ताकद जास्त आहे, तिथे स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे सांगितल्याचे समोर आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. बीएमसीच्या निवडणुकीत भाजपकडे जास्त नगरसेवक आहेत, तर शिवसेनेकडे कमी आहेत. त्यामुळे बीएमसीच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ असेल, तर शिवसेना लहान भाऊ असेल. भाजपने याआधीच मुंबईमध्ये १५० चा नारा दिला आहे. तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेच ताकद जास्त आहे, त्यामुळे तिथे भाजप लहान भाऊ असेल असे समजतेय. परंतु भाजपच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांना ही मान्य नाही.त्यामुळे तिथेही भाजपा आणि शिंदे गटात वाद सुरू असल्याचे समजते.सर्वोच्च न्यायालयाने चार ते पाच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील नेत्यांकडून तयारी सुरू करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. मुंबईत भाजप मोठा भाऊ, शिवसेना लहान भाऊ असणारे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भाऊ असणार आहे.सध्या भाजपच्या नगरसेवकाचे अधिक असल्याने भाजप अधिक जागा घेणार आहे. मुंबईत भा १५० प्लसचा नारा आधीच दिला आहे.त्तर सध्या स्थितीत शिंदेच्या शिवसेनेकडे ४० च्या आसपास साजी नगरसेवक आले आहेत.शिवसेनेची स्थिती पाहता भाजपपेक्षा कमी जागा घ्यावी लागणार आहे. तसेच ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवर थांबावं लागणार आहे. नाशिक महानगरपालिका मध्ये भाजप जास्त जागा घेणार तर पुण्यात राष्ट्रवादी जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर याठिकाणी शिवसेनेला जास्त जगा मिळू शकतात, असेही समजतेय.

error: Content is protected !!