[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड मध्ये सख्ख्या बहिणींचे मृतदेह सापडले- हत्या की आत्महत्या?

बीड/ मैत्रिणीच्या वाढ दिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येने बीड हादरले असून या आत्महत्येची पोलीस चौकशी करीत आहेत कारण ही अत्यंत गंभीर घटना आहे

बीडच्या फ्लावर्स काँटर भागात राहणारे अल्ताफ शेख यांनी आपल्या दोन मुली सानिया आणि नीता यांना त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे सकाळी मोरेवाडीतील यशवंतराव चव्हाण चौकात सोडले होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्वाराती रुग्णालय रोडवरील कंपनीबाग परिसरातील गेट की बावडीत त्यांचे मृतदेह सापडले. विहिरीच्या कठड्यावर ठेवलेल्या बॅगा बराचवेळ तेथेच असल्यामुळे शेळ्या चालणाऱ्या मुलाने याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या मुलींची हत्या झाली की, त्यांनी आत्महत्या केली असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!