[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भिवंडी तालुक्यातील खारबाव इथं भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे शेताच्या बांधावर आक्रोश आंदोलन…

भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील तब्बल 70 एकर पेक्षा जास्त शेत जमिनीच्या सात बारा वरील पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे महसूल विभागाने कमी करून सावकाराची नावे लावल्याने भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन शनिवारी   आक्रोश आंदोलन केले आहे.
भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील शेतकरी केल्या शंभर वर्षांपासून त्यांच्या ताब्यातील जामीन कसत असून भाताचे उत्पन्न घेत आहे मात्र त्यांच्या जमिनीच्या सातबारावर सावकाराचे नाव असताना शेतकऱ्यांचे सुद्धा कुळ म्हणून नाव असताना गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढत असताना  अचानक भिवंडीचे प्रांताधिकारी मोहन नळदकर यांची बदली झाल्याच्या पूर्व संध्येला शेतकऱ्यांची नावे वगळून फक्त सावकाराचे नाव ठेवण्याची ऑर्डर दिल्याने खारबाव गावातील शेतकरी भूमिहीन झाल्याने शनिवारी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन आक्रोश आंदोलन केले आहे. यावेळी प्रांत अधिकारी यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.याबाबत बदली झालेले प्रांत अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असताना आम्ही नियमानुसार केल्याचे सांगितले
आहे .

error: Content is protected !!