ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ग्रेटर बंगला देशाच्या नकाशात भारताचा अनेक भाग


मीरपूर/ढाक्यात सक्रिय असलेल्या सल्तनत-ए-बांगला नावाच्या इस्लामी गटाची भारत सरकारने दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, या गटाला तुर्की यूथ फेडरेशन या तुर्की स्वयंसेवी संस्थेचा पाठिंबा आहे. या गटाने तथाकथित ग्रेटर बांगलादेशचा नकाशा जारी केला आहे, ज्यात भारताच्या अनेक भागांचा समावेश आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ते बोलत होते.
शाहबाग येथील ढाका विद्यापीठाच्या शिक्षक विद्यार्थी केंद्रात आयोजित कार्यक्रमात सल्तनत-ए-बांगलाने ग्रेटर बांगलादेशचा नकाशा जाहीर केला. ही प्रतिष्ठित संस्था आता फुटीरतावादी गटाचे तात्पुरते मुख्यालय आहे.
इंटलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा गट कट्टरपंथी विचारसरणीचे पुनरुज्जीवन करण्याचा आणि बांगलादेशातील तरुणांना संघटित करण्याचा प्रयत्न करीत आहे, विशेषत: ग्रेटर बांगलादेश च्या उभारणीच्या बाजूने असलेल्यांना. ही संस्था मध्ययुगीन बंगाल सल्तनतच्या वारशाबद्दल फार पूर्वीपासून बोलत आहे.यागटाने जाहीर केलेल्या तथाकथित ग्रेटर बांगलादेशच्या वादग्रस्त नकाशामध्ये म्यानमारचा अराकान प्रदेश आणि पश्चिम बंगाल, झारखंड, त्रिपुरा, आसाम, बिहार, ओडिशा आणि ईशान्येकडील इतर राज्यांसह भारताच्या मोठ्या भागाचाही समावेश आहे. सल्तनत-ए-बांगला हे नाव बंगाल सल्तनतवरून आले आहे, जे एक स्वतंत्र मुस्लिम शासित राज्य होते ज्याने इ.स. 1352 ते 1538 दरम्यान राज्य केले.

सल्तनतने सध्याच्या पूर्व भारताचा आणि बांगलादेशचा काही भाग व्यापला होता. बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारशी हा गट किती जवळचा आहे, याची भारतीय यंत्रणांना अधिक चिंता आहे.हा निधी मोहम्मद युनूस यांची मुलगी दीना अफरोज युनूस याच्याशी संबंधित असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

error: Content is protected !!