वक्फ – संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली/संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वक्त संशोधन विधेयक अखेर रात्री उशिरा संसदेत २८८ विरुद्ध २३३ मतांनी मंजूर झाले आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे हे विधेयक मंजूर होणे हा केंद्रातील एनडीए सरकारचा फार मोठा विजय आहे
वक्त संशोधन विधेयक अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडले त्यानंतर या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गरमागरम चर्चा झाली काँग्रेस समाजवादी पक्ष आणि इतर काही पक्षाने या विधेयकाला विरोध करताना या विधेयकाच्या माध्यमातून सरकार मुस्लिमांच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करीत आहे तसेच मुस्लिमांच्या जमिनीवर हक्क सांगण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न करीत आहे असा आरोप केला तर या विधेयकाबाबत विरोध देशातील जनतेची दिशाभूल करीत आहे व बोर्डाच्या कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसेल केवळ देणग्या म्हणून जमिनी देण्यात आलेले आहेत त्याचे योग्य नियोजन होते की नाही याकडे लक्ष ठेवणे आणि तशा कायदा करणे हेच या विधेयकाचे उद्दिष्ट आहे कारण भारतातील हिंदू देवस्थानांच्या काही जमिनी वक्फ बोर्डाने बळकावल्याचे आरोप होत आहेत त्याची चौकशी होणे आवश्यक आहे वक्फ बोर्डात गैर मुस्लिमाना घेतले जाणार नाही याची ग्वाही सरकारकडून देण्यात आल्याचे समजते दरम्यान या विधेयकावर रात्री उशिरा पर्यंत चर्चा होऊन ही विधेयक अखेर मंजुरीसाठी मतदानास टाकण्यात आले यावेळी २८८ विरुद्ध २३३ मतांनी हे विधेयक मंजूर झाले.
