[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

केंद्र सरकार जम्मू – काश्मीरचे नाव बदलणार

श्रीनगर- काश्मीरचं नाव आता बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. ते ‘जम्मू -काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस ’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की काश्मीरचं नावं कश्यपपासून असू शकतं. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की भारतीय संस्कृतीचा पाया हा काश्मीमध्येच घालण्यात आला. इथे सुफी आणि बौद्ध संस्कृती देखील खूप चांगल्या पद्धतीने रूजली गेली.काश्मिरी, डोगरी, बाल्टी, झंस्करारी या भाषांना सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी काश्मीर संदर्भात खूप विचार करतात. काश्मीरमधील ज्या स्थानिक भाषा आहेत त्या जीवंत राहिल्या पाहिजेत, त्यांचं जतन झालं पाहिजे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह होता, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. बोलताना ते म्हणाले की,कलम 370 आणि 35 ए हा देशाच्या एकतेमधील सर्वात मोठा अडथळा होता. मात्र आता मोदी सरकारनं हा अडथळा दूर केला आहे. कलम ३७० हटवण्यात आलं आहे. त्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये विकासाची नवी गंगा आली आहे. अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत.

error: Content is protected !!