[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
मुंबई

जखमी कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्र्यांचा फोन


मुंबई/ मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करताना दोन बोटे गमावलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी फोन करून तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करावे लवकर बऱ्या व्हा ! असे सांगितले
कल्पिता पिंपळे या सध्या ठाण्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या एका बोटावर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली घोडबंदर रोडवरील कासारवडवली माजिवडा नाक्यावर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करीत असताना अमरजित यादव नावाच्या फेरीवाल्याने त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता त्यात त्यांची बोटे तुटली होती त्यानंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली होती या घटनेबद्दल तसेच कल्पिता पिंपळे यांच्या धडसाबद्दल काल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे फोन करून कौतुक केले

error: Content is protected !!