[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर

कुंभमेळ्याच्या तारखा रविवारी १ जून रोजी जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी कुंभमेळा नियोजन संदर्भात साधू महंत यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सर्व १३ आखाड्यांचे प्रमुख प्रत्येकी दोन साधू – महंत उपस्थित होते.
31 ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात होईल.
पहिले अमृत स्नान/२ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृत स्नान/३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृतं स्नान/११ सप्टेंबर २०२७

error: Content is protected !!