[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान


बंगळुरू – सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पारा वाढला असून कॉंग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांनी वापरलेल्या अपशब्दांवर जोरदार पलटवार केला. त्यांनी म्हटलंय की, कॉंग्रेसचे लोक नेहमीच शिव्या देत असतात. कॉंग्रेसच्या या शिव्या एके दिवशी मातीत मिसळून जातील. पंतप्रधान मोदींनी त्यांना देण्यात आलेल्या शिव्यांचा पाढा वाचताना सांगितले की, आतापर्यंत कॉंग्रेसने त्यांना ९१ वेळा शिव्या दिल्या.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कनार्टकमधील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचार सभेत कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या एका वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. खरगे यांनी कनार्टकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. दरम्यान सार्वजनिक क्षेत्रात काम करताय तर शिव्या खाण्याची तयारी ठेवा असा पलटवार प्रियांका गंदजींनी केला आहे

error: Content is protected !!