[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शरद पवाराणी वाट लावली असे म्हणत – सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव! गाडीवर बाटल्या फेकल्या


मुंबई/मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेले आंदोलक आता हिंसक बनत आहेत.आज मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आझाद मैदानात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तसेच शरद पवाराणी मराठ्यांचे वाटोळे केले अशा घोषणा दिल्या. तर दुसरीकडे लोणंद जवळच्य नीरा गाव येथे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. दरम्यान आझाद मैदानात आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आजपासून पाणीही न पिण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी पेटणार आहे.
आझाद मैदानातून बाहेर पडताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती. तसेच, सुप्रिया सुळे या आंदोलन स्थळावरून, आझाद मैदानातून बाहेर पडताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालत आक्रमपणे घोषणा देत आत्तापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, असेही त्यांनी म्हटले. तसेच त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्याही फेकल्या दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी याकडे आधी लक्ष द्यावं आणि निर्णय घ्यावा. तुम्ही आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली आणि सत्ता स्थापन केली ना, मुख्यमंत्री बनले ना? मग आता सत्तेत आहात. सरकार तुमचं आहे आणि निर्णयही तुम्हाला घ्यायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही आम्हाला काय विचारताय? आमच्यावर का टाकताय? याचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे, हे विरोधकांवर टाकू नका, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
आंदोलकांचा इतका मोठा रोष असताना सुप्रिया सुळे यांनी संयम ढळू दिला नाही. त्या चारही बाजूने आंदोलकांना हात जोडून नमस्कार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा राग नव्हता. त्या स्मितहास्य करुन आंदोलकांना नमस्कार करताना दिसत होत्या. यावेळी काही आंदोलकांनी त्यांना सुखरुप गाडीत बसवलं. पण गाडीत बसवल्यानंतर काही आंदोलक आणखी आक्रमक झाले. त्यांनी चारही बाजूने गाडीला घेरलं. ते जोरदार घोषणाबाजी करत राहिले.यावेळी काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची गाडी जावू द्यावी यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने सुप्रिया सुळे यांची गाडी जाण्यासाठी मार्ग निघाला. सुप्रिया सुळे यांची गाडी जसजसी पुढे जात होती तसतसे आंदोलक गाडीच्या मागे पळत होते. यावेळी आक्रमक आंदोलकांनी सुप्रिय सुळे यांच्या गाडीच्या दिशेला पाण्याच्या बाटल्यादेखील फेकल्या. आंदोलकांचं हे सर्व रुप धक्कादायक होतं. गेल्या दोन दिवसांपासून मराठा आंदोलक शांत होते. पण आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत
दरम्यान आज उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता सुधा हजर होते. जरांगेंच्या मागण्यांबाबत सर्व कायदेशीर बाजू तपासल्या जात आहेत.तर आज चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या विधानावर जरांगे चांगलेच संतप्त झाले त्यानंतर चंद्रकांत दादानी घुमजाव करीत सारवासारव केली.

  • मुंबईत मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई जाम केलेली असताना, ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध करणारे लक्ष्मण हाके यांच्यावर सातारा जिल्ह्यातील नीरा येथे हल्ल्याचा प्रयत्न झाला .ते लोणंदकडे जात असताना रस्त्यावर एक हॉटेलात चहा प्यायला थांबले होते. त्याच वेळी बाहेर मराठा आंदोलक आले. त्यांनी हाकेना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी हकेना त्यांच्या गराड्यातून सोडवून सुरक्षित गाडीपर्यंत पोहचवले म्हणून हाके बचावले.
error: Content is protected !!