अल कायदाच्या दहशतवादी महिलेला अटक! तरुणान जिहादी बनवण्याचे षड्यंत्र
बंगळुरु/गजवा-ए-हिंद’ साठी छुपा अजेंडा राबवणाऱ्या महिला दहशतवाद्याला गुजरात एटीएसने अटक केली. बंगळुरुमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. 30 वर्षीय शमा परवीन ही गेल्या काही दिवसांपासून एका खास मिशनवर काम करत होती. तिच्या साथीदारांना एटीएसने यापूर्वी नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून उचलले होते. 3 दहशतवाद्यांना अटक केली होती. शमी परवीन ही त्यातील पुढील कडी होती. तिच्या अटकेमुळे दख्खनमध्ये अल कायदा तरुणांचे ब्रेन वॉश करते असल्याचे समोर आले आहे.
गुजरात एटीएसने अल-कायदाचे इंडियन मॉड्यूल समोर आणले. त्यात शमा परवीन हिला बंगळुरू येथून अटक केली आहे. ती या मॉड्यूलची मास्टरमाईंड मानण्यात येत आहे. एटीएसने 23 जुले रोजी अल कायद्याशी संबंधीत चार दहशतवाद्यांना देशातील विविध भागातून अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून शमाचे नाव वारंवार समोर येत होते. शमा परवीनचे नाव समोर आल्यावर तिला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी सात दिवसानंतर कर्नाटकाची राजधानी बेंगळुरू येथून अटक केली. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पकडण्यात आलेली महिला ही पाकिस्तानच्या थेट संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ही महिला समाज माध्यमावर सक्रिय असल्याचे समोर आले आहे.गुजरात एटीएसने केलेल्या खुलाश्यानुसार, त्यांनी मोठ्या दहशतवादी प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. पकडण्यात आलेले दहशतवादी हे इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ‘गजवा-ए-हिंद’ चा प्रसार करत असल्याचे समोर आले आहे. भारतातील तरुणांची माथी भडकवण्याचे आणि त्यांना अल कायद्याच्या प्रवाहात ओढण्याचे काम परवीन करत होती. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. जिहादी विचार पसरवण्यासाठी ५ इन्स्टाग्राम खाती परवीन चालवत होती. त्यात ती तरुणांना जिहादी विचारासाठी प्रवृत्त करत होती. जिहादसाठी बॉम्बची नाही तर केवळ एका चाकूचीच गरज आहे, असे जहाल विचार ती पसरवत होती. तिच्या इन्स्टाग्राम खात्यांची एटीएस कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत किती तरूण तिच्या संपर्कात आले, याचा पण तपास होण्याची शक्यता आहे.